मोठी उमरीत युवकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 02:21 IST2016-03-09T02:21:47+5:302016-03-09T02:21:47+5:30
क्षुल्लक कारणावरून तलवारीने प्राणघातक हल्ला.

मोठी उमरीत युवकावर प्राणघातक हल्ला
अकोला: मोठी उमरीतील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ क्षुल्लक कारणावरून एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोठी उमरीतील रहिवासी संतोष कोथळकर यांच्यावर क्षुल्लक कारणावरून गजानन सावरकर व राजू सावरकर या दोघांनी तलवारीने हल्ला चढविला. यामध्ये कोथळकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गजानन व राजू सावरकर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.