देगाव सर्कल मध्ये १ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:21+5:302021-03-08T04:19:21+5:30

देगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये खिरपुरी, नकाशी, भरतपूर, खामखेड, तामशी, मांडवा येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत भूमिपूजन सोहळा ...

Bhumi Pujan of development works worth Rs. 1 crore 24 lakhs in Degaon Circle | देगाव सर्कल मध्ये १ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

देगाव सर्कल मध्ये १ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

देगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये खिरपुरी, नकाशी, भरतपूर, खामखेड, तामशी, मांडवा येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत भूमिपूजन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव तथा प्रदेश प्रवक्ता राजेंद्रभाऊ पातोडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, जि.प. चे उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, कृषी सभापती पंजाबराव वढाळ, समन्वय समितीचे सदस्य दिनकरराव खंडारे, माजी तालुका अध्यक्ष देवानंद अंभोरे, जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर उपस्थित होते.

यावेळी खिरपुरी बु. येथील सरपंच रोहिनीताई अमोल कवळकार, उपसरपंच वंदना बिन्ना शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक गजेंद्र बाळापुरे, खामखेड सरपंच ज्योत्स्ना उद्धव हागे, उपसरपंच मीनाक्षी सुरेश इंगळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यु. एम. थिटे, नकाशी, तामशी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.स (वा.प्र.) ८ बाय १२ (फोटो)

Web Title: Bhumi Pujan of development works worth Rs. 1 crore 24 lakhs in Degaon Circle