‘एमआयडीसी’ मध्ये ४२ कोटींच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन!
By संतोष येलकर | Updated: February 11, 2024 16:28 IST2024-02-11T16:28:13+5:302024-02-11T16:28:46+5:30
औद्योगिक वसाहतमध्ये ४२ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

‘एमआयडीसी’ मध्ये ४२ कोटींच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन!
अकोला: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अकोल्यातील औद्योगिक वसाहतमध्ये ४२ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्र पायाभूत सुविधा अंतर्गत संबंधित विविध कामांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामध्ये ‘एमआयडीसी’ फेज क्र. १,२ व ३ मधील रस्त्यांचे डांबरीकरण, अकोला विकास केंद्र वाहतूक नगर रस्त्याची सुधारणा आदी विविध कामे होणार आहेत. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला.