सौंदळा येथे भीम जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST2021-04-18T04:17:45+5:302021-04-18T04:17:45+5:30

-------------------------------------- वरुर जऊळका येथे महामानवाला अभिवादन वरुर जऊळका : येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ...

Bhim Jayanti celebrations at Saundala | सौंदळा येथे भीम जयंती उत्साहात

सौंदळा येथे भीम जयंती उत्साहात

--------------------------------------

वरुर जऊळका येथे महामानवाला अभिवादन

वरुर जऊळका : येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्यात आले. बौद्ध विहार परिसरामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. विहारात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उषाताई काठोळे यांचे हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नाना दांदळे, धाडे, अंभोरे आदी उपस्थित होते. वरुर येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंगेश रेखाते, शांताराम पडोळे, संतोष कात्रे आदी उपस्थित होते.

------------------------------------------

राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे भीम जयंती उत्साहात

बाळापूर : अकोला शहरातील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार बळीराम सिरस्कार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दिनकर वाघ, महिला आघाडी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अर्चना थोरात, सुनील अंभोरे, विद्याताई अंभोरे, मनोज सिरसाट, धनंजय सिरस्कार, दिलीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Web Title: Bhim Jayanti celebrations at Saundala