भारिप-बमसं कार्यकर्त्यांचा शिवसंग्राममध्ये प्रवेश
By Admin | Updated: August 23, 2014 02:12 IST2014-08-23T01:41:42+5:302014-08-23T02:12:21+5:30
बाळापूर येथे भारिप-बमसं कार्यकर्त्यांंचा शिवसंग्राममध्ये प्रवेश.

भारिप-बमसं कार्यकर्त्यांचा शिवसंग्राममध्ये प्रवेश
बाळापूर : भारिप-बमसंची सत्ता असूनही दलित वस्तीतील कामे होत नसल्याने सामाजिक काम करण्याची शिवसंग्रामने आणलेल्या संधीचं सोनं करण्याचा निर्धार ठेवून भारिप-बमसंच्या खिरपुरी बु. येथील कार्यकर्त्यांंनी एकदिलाने शिवसंग्राममध्ये प्रवेश घेतला.
बाळापूर मतदारसंघात भारिप-बमसंची सत्ता आहे. आमदार, पं.स. सभापती, जिल्हा परिषद सदस्य भारिपचे असतानासुद्धा दलित वस्तीत कामे होत नाहीत. दलित वस्तीत स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, ठिकठिकाणी गटारे वाहत असताना लोकप्रतिनिधी केवळ निवडणुका आल्यावर मताचे राजकारण करून झोळी भरतात. निवडणुकानंतर मतदारसंघातील दलित वस्तीत दुर्लक्ष करून दलित वस्तीचा विकासाचा निधी इतरत्र वापरून दलित वस्तीला दुर्लक्षित करण्यात येत असल्याचा प्रत्यय पाहूनच खिरपुरी बु. येथील मंगेश शा. शिरसाट, महेंद्र शिरसाट, देवेंद्र इंगळे, सम्राट ल. शिरसाट, प्रज्ञाशील गोपनारायण, बबन शिरसाट, राजरत्न शिरसाट, राजेश सावदेकर, सुमेध शिरसाट, नितेश शिरसाट, आनंद शिरसाट, अमर शिरसाट, अमोल शिरसाट, संदीप शिरसाट, विनोद शिरसाट, सुभाष वानखडे यांनी शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांच्या कार्यशैलीवर विश्वास टाकून त्यांना सहकार्य करण्याची हमी घेतली. यावेळी अक्षय पाटील दांदळे, अक्षय अवातिरक, सुरेश अवातिरक, गोकूल सोळंके, संदीप अवातिरक, पवन गाढे, शशिकांत दांदळे, नितीन मानकर, उमेश घोंगरे, विजय दांदळे, विठ्ठल माळी, रवी पाटील, अवातिरक, आाकाश मांगटे, पंकज घोंगटे आदी उपस्थित होते.