शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पश्चिम वऱ्हाडातील सामाजीक कार्यात भैय्युजी महाराजांच्या पाऊलखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:09 IST

- राजेश शेगोकारअकोला : बुलडाण्याच्या हिवरा आश्रम येथे दर जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान मोठा उत्सव असतो, यात्रा भरते. विवेकानंद जन्मोत्सव असे या उत्सवाचे नाव. अशी एखादी जत्रा, मोठा कार्यक्रम असला की, खिसे कापणाऱ्याचे चांगलेच फावते हिवरा आश्रम त्याला अपवाद कसे राहिल. एका जन्मोत्सव सोहळयाच्या कालावधीत त्याच परिसरात पारधी समाजाची पंचायत होती. १२ ...

ठळक मुद्देपारधी समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी खामगावातील सुर्याेदय आश्रमात पारधी-आदीवासी समााजातील मुलांसाठी निवासी शाळा सुरू केली. भैय्युजी महाराज यांनी विदर्भातील पहिल्या आश्रमाची स्थापना अकोल्यात केली. एचआयव्हीग्रस्त मुलांचे वसतीगृह असे नाव असलेल्या या वसतीगृहामध्ये सध्या ५२ मुले-मुली आहेत. या एचआयव्हीग्रस्त मुलांपैकी सात मुलांची लग्नेही एचआयव्ही जोडीदारांशी लावून त्यांना संसाराला लावले.

- राजेश शेगोकार

अकोला : बुलडाण्याच्या हिवरा आश्रम येथे दर जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान मोठा उत्सव असतो, यात्रा भरते. विवेकानंद जन्मोत्सव असे या उत्सवाचे नाव. अशी एखादी जत्रा, मोठा कार्यक्रम असला की, खिसे कापणाऱ्याचे चांगलेच फावते हिवरा आश्रम त्याला अपवाद कसे राहिल. एका जन्मोत्सव सोहळयाच्या कालावधीत त्याच परिसरात पारधी समाजाची पंचायत होती. १२ जानेवारी २००८ मधील अशाच एका सोहळयाला भेट देण्याासाठी एक व्यक्ती आली होती. जन्मोत्सवाच्या गर्दीतून वाट काढत त्या पंचायत जवळ पोहचेपर्यंत त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे पाकीट मारल्या गेले. पाकीटात फार मोठी रक्कम नव्हती पण पाकीट गेल्यावर अस्वस्थता येणे सहाजिकच आहे. त्यांनी चौकशी केली असता कळले की लहान मुले पाकिटमारी करतात. हे कळल्यावर ज्यांचे पाकिट गेले ती व्यक्ती अस्वस्थ झाली, मनात शंकाचे काहूर उठले. अन् त्यांनी संकल्प केला अशा मुलांसाठी मी शिक्षणाची दारे खुली करीत. पाकीट मारणाºया हातांमध्ये लेखणीचे दान देईल. अन् अवघ्या काही महिन्यात हा संकल्प तडीस गेला. हा संकल्प सिद्धीस नेणारी ती व्यक्ती होती संत भैय्युजी महाराज.पोटासाठी भटंकती करणाºया पारधी समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी खामगावातील सुर्याेदय आश्रमात पारधी-आदीवासी समााजातील मुलांसाठी निवासी शाळा सुरू केली. जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या समाजातील पुढच्या पिढीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैय्युजी महाराजांनी दिलेल्या ‘लेखणीच्या दाना’ मुळे आज ही शाळा आश्रम शाळा नव्हे तर संस्कार शाळा ठरली. अवघ्या दहा मुलांना घेऊन सुरू झालेली ही शाळा पुढे आपली कक्षा रूंदावत आदीवासीं मुलांनाही सामावून घेत मोठे ज्ञान मंदिर ठरले. आज या शाळेचे विद्यार्थी आयुष्याच्या शाळेत आपले नाव कमावत आहेत. केवळ पुस्तकी शिक्षण न देता जीवन जगण्यासाठी लागणारे तत्वज्ञान भैय्युजी महाराजांच्या मार्गदर्शनात या मुलांना मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परिवाराची भटकंती थांबली आहे.खामगावातील सुर्योदय आश्रमाने अशा अनेक समाजोपयोगी कामांमुळे ‘आश्रम’ या शब्दांची परंपरागत व्याखाच बदलून टाकली आहे. भैय्युजी महाराजांच्या विषयी उठणाºया अफवा, वाद यासंदर्भाने पश्चिम वºहाडात त्यांना माननाºयांनी कधीही थारा दिला नाही कारण त्यांनी अनुभवलेले, पाहिलेले भैय्युजी महाराज हे महाराज कमी अन् समाजसुधारक जास्त होती. ती प्रतिमा अजूनही ठळकपणे या परिसरात असल्यामुळेच त्यांच्या आकस्मिक जाण्याचा धक्का अनेकांना बसला आहे. खिसे कापणाºयांना लेखणीचे दान देणारा संत पुरूष विरळाच अशा प्रतिक्रया सर्वत्र उमटत आहे.

एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी अकोल्यात बांधला आश्रमएचआयव्ही म्हटल तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. मग ज्यांना या असाध्य रोगांची लागण झाली आहे त्यांच्या वाटयाला किती हेटाळणी येत असेल. त्यातच ते जर चिमुकले असतील तर मग पुर्ण आयुष्यच अंधकारमय...अशा चिमुकल्यांच्या व्यथा जाणून भैय्युजी महाराज यांनी विदर्भातील पहिल्या आश्रमाची स्थापना अकोल्यात केली. एचआयव्हीग्रस्त मुलांचे वसतीगृह असे नाव असलेल्या या वसतीगृहामध्ये सध्या ५२ मुले-मुली आहेत. या मुलांमुलींना आई-वडील नाहीत. काहींना आई किंवा वडील आहेत मात्र तेही एचआयव्हीग्रस्त असल्याने त्यांच्याही जगण्याशी संघर्ष सुरूच आहे. अशा मुला-मुलींचे आई-वडिल होण्याचे काम भैय्युजी महाराज यांनी केले. अकोल्यातील प्रख्यात व्यक्तिमत्व असलेले पंकज देशमुख यांच्यावर या आश्रमाची जबाबदारी भैय्युजी महाराजांनी सोपविली. त्यांनी ती उत्तम सांभाळली व या एचआयव्हीग्रस्त मुलांपैकी सात मुलांची लग्नेही एचआयव्ही जोडीदारांशी लावून त्यांना संसाराला लावले. भैय्युजी महाराजांना असाच आश्रम पुणे येथे काढायचा होता याबाबत त्यांनी पंकज देशमुख यांच्यासोबत चर्चा ही केली होती मात्र त्यांच्या अशा आकस्मिक जाण्यामुळे एचआयव्हीग्रस्त मुलांचा ‘बाप’ गेल्याची भावना पंकज देशमुख यांनी व्यक्त केली. खुन करणाऱ्या हातांमध्ये सोपविली निरंजनाची वातपुण्यातील येरवडा तुरूंगात भैय्युजी महाजांचे प्रवचन होते. शेकडो कैदी ते प्रवचन ऐकत होते. भैय्युजी महाराज म्हणाले, शिक्षा पुर्ण झाल्यावर ज्यांना चांगले जिवन जगायचे आहे त्यांनी खुशाल माझ्याकडे यावे. शेकडो कैद्यांनी हे प्रवचन ऐकले व सोडून दिले मात्र एक कैदी असा होता जो खुनाची शिक्षा भोगत होता. अहमदनगर जवळील सोनई परिसरातील हा कैदी होता. तो मुळचा पुरोहित, पुजा अर्चा करायचा पण रागाच्या एका क्षणात त्याच्या हातून खून झाला अन् सारेच उध्वस्त झाले. या कैद्याची शिक्षा पुर्ण झाल्यावर त्यांने घर गाठण्याऐवजी भैय्युजी महाराजांना गाठले. येरवाडयातील प्रवचनाची आठवण दिली. महाराजांनी त्याला आश्रमा पुरोहिताची जबाबदारी दिली. वेद शिकविला अन् आज सुर्योदय आश्रमात ती व्यक्ती पौरोहित्य करित आहे. आश्रमात होणाºया विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांच्याच पौराहित्याखाली चक्क भैय्युजी महाराजांनीही विधीपुर्वक पुजा केली आहे.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजAkolaअकोलाDeathमृत्यूSuicideआत्महत्याsocial workerसमाजसेवक