वाइन बारमध्ये सुरू होता सट्टा; पोलिसांनी केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:15 IST2020-10-17T19:15:26+5:302020-10-17T19:15:37+5:30
Batin on IPL in Akola एका वाइन बारमध्ये सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर खदान पोलिसांनी कारवाई केली.

वाइन बारमध्ये सुरू होता सट्टा; पोलिसांनी केली कारवाई
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाइन बारमध्ये सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर खदान पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणावरून दोन युवकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुध्द खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पक्की खोली सिंधी कॅम्प येथील रहिवासी मयूर राजेश जसुजा आणि नानक नगर निमवाडी येथील रहिवासी विजय श्रीचंद कटारिया हे दोघे आयपीएलमध्ये खेळण्यात येत असलेल्या मुंबई-कोलकाता सामन्यावर सट्टा बाजार चालवित असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून खदान पोलिसांनी पाळत ठेवून या दोन युवकांना सिंधी कॅम्पमधील एका वाइन बारमधून सट्ट्याची घेवाण-देवाण करताना रंगेहात अटक करण्यात आली. या दोन युवकांकडून काही दस्तावेज, मोबाइल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विजय श्रीचंद कटारिया व मयूर राजेश जसुजा या दोघांविद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.