पावसाला सुरुवात; शेतक-यांची पेरणीची तयारी!
By Admin | Updated: June 11, 2017 02:38 IST2017-06-11T02:38:19+5:302017-06-11T02:38:19+5:30
शेतक-यांना सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाला सुरुवात; शेतक-यांची पेरणीची तयारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, शेत मशागतीची अंतिम टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. मागील आठ दिवसांपासून ज्या भागात पाऊस अधून-मधून सुरू आहे, त्या ठिकाणी पेरण्यांच्या तयारीत शेतकरी आहे; पण शेतकर्यांना सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्हय़ात मागील आठ दिवसांपासून अधून-मधून पाऊस सुरू असून, काही भागात बर्यापैकी पाऊस झाला आहे. अनेक शेतकर्यांनी मान्सूनपूर्व तूर व कपाशीची पेरणी केली आहे. त्या पिकांना या पावसाचा काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी काही भागात या पावसाने दिलासा दिला आहे. काही शेतकर्यांनी पेरणीसाठीची तयारी चालवली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी १२ टक्के बियाण्यांची खरेदी शेतकर्यांनी केली होती. आता यामध्ये शनिवारपासून वाढ होत आहे. दोन दिवसांत मान्सून राज्यात सर्वत्र दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने बियाणे खरेदीला सुरूवात झाली आहे.