अकाेला विधानपरिषद निवडणुक ठरविणार महाविकास ‘आघाडी’चे भविष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 11:46 PM2020-11-16T23:46:00+5:302020-11-16T23:50:02+5:30

-  राजेश शेगाेकार अकाेला : विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे. ...

The beginning of Mahavikas 'Aghadi' for the upcoming elections | अकाेला विधानपरिषद निवडणुक ठरविणार महाविकास ‘आघाडी’चे भविष्य

अकाेला विधानपरिषद निवडणुक ठरविणार महाविकास ‘आघाडी’चे भविष्य

Next
ठळक मुद्देविधान परिषद निवडणूक: पाचही मतदारसंघात लढत.काॅंग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी दाेन, सेना एका जागेवर रिंगणात.

-  राजेश शेगाेकार

अकाेला : विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे. या पाचही जागांवर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत रंगण्याची संकेत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ महाविकास आघाडीची ताकद समाेर येणार असल्याने भविष्यातील निवडणुकींच्या दृष्टिकाेनातून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या राजकारणाची नांदी ठरण्याचीच चिन्हे आहेत.

काेराेनाच्या संकटामुळे लांबलेल्या विधान परिषद निवडणुकीची अखेर सुरुवात झाली आहे. राज्यातील नागपूर, औरंगाबाद व पुणे पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे या विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले आहेत तर या पाच मतदारसंघांपैकी पदवीधर मतदारसंघातील पुणे व औरंगाबाद या जागा राष्ट्रवादी तर नागपूरची जागा काॅंग्रेस लढवत आहे. शिक्षक मतदारसंघात पुण्याची काॅंग्रेस व अमरावतीच्या जागेवर सेनेने उमेदवार दिला आहे. वरवर पाहता ही निवडणूक सार्वत्रिक व पक्षीय राजकारणाची दिसत नसली तरी भाजपा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे पदवीधराच्या तसेच शिक्षक प्राध्यापकांच्या संघटनांचा प्रभाव संपुष्टात आला आहे. या दाेन पक्षाच्या नेत्यांनीच निवडणुकीची धुरा हातात घेतल्यामुळे ही निवडणूक भाजपा विराेधात महाविकास आघाडी अशा स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील जय पराजय हा भाजपापेक्षा महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही ताकद अजमावण्याची संधी महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरत आहे.

 

भाजपामध्ये सबकुछ फडणवीस

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी भाजपाचे उमदेवार ठरविताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम मानला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपामध्ये फडणवीस यांचे स्थान अधिकच बळकट झाले आहे. विशेषत: नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ठरविताना फडणवीस यांनी दाखविलेले राजकीय चातुर्य यामुळे पक्षात त्यांचा शब्द अंतिम हे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले आहे.

Web Title: The beginning of Mahavikas 'Aghadi' for the upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.