पातुरात गोमांस विक्री; दोघांना अटक

By Admin | Updated: June 4, 2017 05:01 IST2017-06-04T05:01:49+5:302017-06-04T05:01:49+5:30

गोमांसाची विक्री करत असलेल्या दोघांना पातूर पोलिसांनी शनिवारी अटक केली.

Beef sale in the street; Both arrested | पातुरात गोमांस विक्री; दोघांना अटक

पातुरात गोमांस विक्री; दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : आठवडी बाजारात गोमांसाची विक्री करत असलेल्या दोघांना पातूर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून ३० किलो मांस जप्त केले आहे. आठवडी बाजाराजवळील बोर्डी नदीजवळ शे. इब्राहीम शे अमन कुरेशी(३५), शे. मेहबूब शे. रसुल (३५) दोघेही रा. मुजावरपुरा हे गोमांस विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पातूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी धाड टाकून दोघांना अटक केली, तसेच त्यांच्याजवळून ३० किलो गोमांस किंमत ४३०० रुपये जप्त केले. दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ५, ब, अ, ९ अ प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोघांचीही जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Web Title: Beef sale in the street; Both arrested