गुरांच्या मांसाची वाहतूक करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:33 IST2017-08-07T02:33:30+5:302017-08-07T02:33:30+5:30

beef man arrested at akola | गुरांच्या मांसाची वाहतूक करणारा गजाआड

गुरांच्या मांसाची वाहतूक करणारा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गांधी रोडवरून ६० किलो गुरांचे मांस दुचाकीवरून घेऊन जात असलेल्या एका इसमास सिटी कोतवाली पोलिसांनीही रविवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी  त्याच्याजवळून दुचाकीही जप्त करून तब्बल ६० किलो मांस जप्त केले.
मतदनलाल धिंग्रा चौक ते गांधी मार्गावरून एक दुचाकीचालक मांस घेऊन जात असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी मदनलाल धिंग्रा चौकामध्ये सापळा रचला. पोलिसांनी दुचाकी क्र. एमएच ३० डब्ल्यू ९६०० चालकास अडवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये गुरांचे मांस मिळून आले.  बार्शीटाकळी येथील रहिवासी शेख कयुम शेख बल्लू कुरेशी (४८) असे दुचाकीचालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्यास अटक केली असून, त्याच्याजवळून ६० किलो मांस नऊ  हजार ६०० रुपये व दुचाकी, असा ऐवज जप्त करून अटक केली आहे.

Web Title: beef man arrested at akola