अंदुरा येथे कापूस वेचणीसाठी गेलेल्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:40 IST2017-11-03T19:37:19+5:302017-11-03T19:40:38+5:30
अंदुरा : कापूस वेचणी करीत असलेल्या शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता अंदुरा येथे घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून, आठ जण जखमी झाले. शेगाववरून हे मजूर कापूस वेचणीकरिता अंदुरा येथे आले होते.

अंदुरा येथे कापूस वेचणीसाठी गेलेल्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला!
लोकमत न्यूज नेटवर्क
अंदुरा : कापूस वेचणी करीत असलेल्या शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता अंदुरा येथे घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून, आठ जण जखमी झाले. शेगाववरून हे मजूर कापूस वेचणीकरिता अंदुरा येथे आले होते.
अंदुरा येथील शेतकरी गेंदालाल गुप्ता यांच्या शेतामध्ये शेगाववरून मजूर कापूस वेचणीकरिता गेला असता तेथे असलेल्या आगेमोहाच्या मधमाशांनी शेतमजुरांवर हल्ला चढविला. त्यामध्ये मंगला ठाकूर, रेणुका मगर, दुर्गा देवाते, प्रमिला भारसाकळे, सविता चिंचोळकर, मंगला राऊत, यमुना लिप्ते सर्व रा. शेगाव हे जखमी झाले, तर त्यामधील मंगला ठाकूर व रेणुका मगर यांची प्रकृ ती गंभीर आहे. जखमींना त्वरित अंदुरा येथील प्रणय गुप्ता, संदीप वानखडे, ज्ञानेश्वर नेमाडे यांनी पुढील उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.