क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:10+5:302021-07-17T04:16:10+5:30

निहिदा : पिंजर पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या दोनद बु. येथे एक महिला व तिचा मुलगा रस्त्याने जात असताना एकाने या ...

Beating a woman for trivial reasons; Filed a crime | क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

निहिदा : पिंजर पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या दोनद बु. येथे एक महिला व तिचा मुलगा रस्त्याने जात असताना एकाने या रस्त्याने ये-जा का करता, या क्षुल्लक कारणावरून वाद घालून महिलेस अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी पिंजर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संगीता मनोहर प्रधान (रा.दोनद बु.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ती व तिचा मुलगा गुरे घेऊन शेतात जात असताना आरोप मनोहर महल्ले (रा. दगडपारवा) याने महिलेसह मुलाला या रस्त्यावरून का जाता, म्हणून हटकले. त्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. या फिर्यादीवरून आरोपी मनोहर महल्ले (रा. दगडपारवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.

Web Title: Beating a woman for trivial reasons; Filed a crime