एकास मारहाण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:23+5:302021-04-06T04:18:23+5:30

पातूर : पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पातूर-अकोला मार्गावर कापशीनजीक एका युवकास अज्ञात तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. ५) ...

Beating one; Filed a crime | एकास मारहाण; गुन्हा दाखल

एकास मारहाण; गुन्हा दाखल

पातूर : पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पातूर-अकोला मार्गावर कापशीनजीक एका युवकास अज्ञात तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास घडली. सागर मोतीलाल केवट (२०) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर मोतीलाल केवट यांनी पातूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पातूर-अकोला मार्गावर कापशीनजीक रस्त्याचे काम सुरू असल्याने मुरमाचा टिप्पर खाली करण्याकरिता ये-जा करणारे वाहन थांबविण्याचे सागर काम करतो. यावेळी दुचाकीने (क्र. एमएच ३०, बीजे ६५५२) दोघे व स्कूटीने एक, असे तीन अज्ञात आरोपींनी संगनमत करून गाड्या का थांबवल्या, असे म्हणून सागर केवट यास दगडाने आणि काठ्यांनी मारहाण केली. सागर मोतीलाल केवट (२०, रा. कापशी रोड) याने पातूर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार पातूर पोलिसांनी भादंविच्या ३२४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात हिम्मतराव दिघोडे करीत आहेत.

Web Title: Beating one; Filed a crime