सोशल मीडियावरील गुन्हय़ांबाबत सतर्क राहा!
By Admin | Updated: September 18, 2014 02:20 IST2014-09-18T02:20:38+5:302014-09-18T02:20:38+5:30
‘सायबर क्राईम’वर अकोला पोलिसांची कार्यशाळा.

सोशल मीडियावरील गुन्हय़ांबाबत सतर्क राहा!
अकोला : धार्मिक भावना दुखावून जातीय दंगली भडकाविण्याच्या उद्देशाने समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करीत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून समाजकंटक त्यावर अश्लील छायाचित्रे व मजकूर, देवी-देवता, थोरपुरुष यांची विकृत छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या माध्यमा तून घडणार्या गुन्हय़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून, हे गुन्हे उघडकीस आणून समाजकंटकांना वठणीवर आणण्याचे काम करण्याची गरज असल्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सांगितले.
बुधवारी दुपारी पोलिस मुख्यालयातील मनोरंजन सभागृहामध्ये आयोजित ह्यसायबर क्राईमह्ण विषयावरील कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे, गणेश गावडे उपस्थित होते. नाशिक येथील विकास नाईक यांनी सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन करताना आव्हाने आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली. युवकांकडून फेसबुक, व्हॉट्स अँप, व्ट्टिरचा गैरवापर होत असून, त्यावर अश्लील संदेश, छायाचित्रे, विटंबनात्मक छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सोशल मीडियावर घडणारे गुन्हे हे एक आव्हान आहे; परंतु त्यासाठी उपाययोजना लक्षात घेतल्या तर त्याला आळा घालता येऊ शकतो, असेही नाईक यांनी सांगितले.