शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"बावनकुळे म्हणजे मतिमंद माणूस", ठाकरेंच्या आमदाराची भाजपवर जबरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 19:31 IST

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन संसार थाटला आहे. जवळपास ५० आमदारांना सोबत घेत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. सत्तासंघर्षाच्या या धावपळीत महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या आमदारांपैकी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख  हे पळून आले, त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचंही स्पष्ट करत एकनाथ शिंदेवर टीका केली होती. आता, नितीन देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना आमदार देशमुख यांनी ही घणाघाती टीका केली. 

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. फडतूस गृहमंत्री असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाणे प्रकरणातील मारहाणीवरुन लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भाजप नेते ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवर शाब्दीकरित्त्या तुटून पडले. त्यावेळी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट इशाराच दिला होता. उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यावर, आता आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्त्युतर दिलंय. 

''बावनकुळे यांची औकात काय आहे? त्यांनी मातोश्रीच्या बाहेर जाऊन उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवावे. खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे आहे. त्यांच्याकडे पाहिले तर ते एक मतिमंद असलेला माणूस दिसतात. मतिमंद माणसाने अशी भाषा बोलू नये.'', अशा शब्दात आमदार देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली. 

काय म्हणाले होते बावनकुळे

"उद्धव ठाकरे यांनी आज फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यानं मर्यादा ओलांडली आहे. पण अजूनही आम्ही त्यांना आज शेवटची संधी देत आहोत. यापुढे जर आमच्या नेत्यांबाबत अशी वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचं घराबाहेर पडणं मुश्कील होईल. ज्या फडणवीसांना तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी विधानं कराल असं कधीच वाटलं नव्हतं", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMumbaiमुंबईAkolaअकोलाUddhav Thackerayउद्धव ठाकरे