बार्शिटाकळी : मुलगा, मुलगी व नातवाच्या छळाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:01 IST2017-12-28T02:00:49+5:302017-12-28T02:01:14+5:30

बार्शिटाकळी : स्थानिक अशोकनगरामधील ८0 वर्षीय वृद्ध इसमाचे मुलगा, मुलगी व नातू यांनी संगनमत करून घर विकले. त्या वृद्धास काटेपूर्णा येथे घरी नेऊन त्यांचा अनन्वित छळ करून घरातून हाकलून दिले. या सार्‍या छळास कंटाळून सदर वृद्धाने २७ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

Bartislavali: Child's Suicide Suffering From Boy, Girl, and Natty Harassment | बार्शिटाकळी : मुलगा, मुलगी व नातवाच्या छळाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

बार्शिटाकळी : मुलगा, मुलगी व नातवाच्या छळाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

ठळक मुद्देवृद्धाने लिहिलेल्या चिठ्ठय़ांच्या आधारे तिघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शिटाकळी : स्थानिक अशोकनगरामधील ८0 वर्षीय वृद्ध इसमाचे मुलगा, मुलगी व नातू यांनी संगनमत करून घर विकले. त्या वृद्धास काटेपूर्णा येथे घरी नेऊन त्यांचा अनन्वित छळ करून घरातून हाकलून दिले. या सार्‍या छळास कंटाळून सदर वृद्धाने २७ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या वृद्धाने मृत्यूपूर्वी पोलीस अधिकार्‍यांच्या नावे लिहून ठेवलेल्या पाच चिठ्ठय़ांच्या आधारे बाश्रीटाकळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बार्शिटाकळी येथील अशोक नगरातील चोखाराम जयराम जामनिक (८0) यांचे स्वत:च्या मालकीचे घर मुलगा रामदास, मुलगी शोभा दिलीप मोहोड व तिचा मुलगा यांनी संगनमत करून विकले. त्यानंतर चोखाराम यांना काटेपूर्णा या गावी नेऊन आरोपींनी त्यांचा अनन्वित छळ केला. अखेर त्यांना घरातून हाकलून दिले. हा सर्व छळ असह्य झाल्याने चोखाराम यांनी पोलीस अधिकार्‍यांच्या नावाने पाच चिठ्ठय़ा लिहून बुधवारी सकाळी ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.  या घटनेच्या इनक्वेस्ट पंचनाम्यात या पाच चिठ्ठय़ा आढळून आल्या. या आत्महत्येच्या घटनेबाबत पोलीस पाटील श्रीराम येळवणकर यांच्या फिर्यादीवरून बार्शिटाकळी पोलिसांनी त्या चिठ्ठय़ांच्या आधारे रामदास जामनिक, शोभा दिलीप मोहोड व तिचा मुलगा यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या ३0६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक खांडवाये पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Bartislavali: Child's Suicide Suffering From Boy, Girl, and Natty Harassment