बार्शीटाकळी तालुका @८६.३९ %
By Admin | Updated: May 31, 2017 01:15 IST2017-05-31T01:15:48+5:302017-05-31T01:15:48+5:30
बार्शीटाकळी : तालुक्याचा ८६.३९ टक्के निकाल लागला. तालुक्यातील २,७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बार्शीटाकळी तालुका @८६.३९ %
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी: माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मंगळवारी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्याचा ८६.३९ टक्के निकाल लागला. तालुक्यातील २,७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यलय बार्शीटाकळीचा निकाल ८८.२० टक्के, ज्ञानप्रकाश क.महा. पिंजर ८५.०३, बाबासाहेब धाबेकर क. महा. घोटाचा निकाल ९४.७३ टक्के, गुलाम नबी आझाद क. महाविद्यालय बार्शीटाकळीचा निकाल ७५.५१ टक्के, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय विझोराचा निकाल ९०.९७ टक्के, बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय राहीत ८४.६१ टक्के निकाल लागला. गितांजली कनिष्ठ महाविद्यालय, कान्हेरी सरप ९५.९५ टक्के, सिद्धेश्वर कनिष्ठ महा. धाबा ८५.९८, सावित्रीबाई फुले कन्या क.महा. धाकली ८२.९०, जय बजरंग क.महा. रुस्तमाबाद ८०.०६ टक्के, मनोहर नाईक क.महा. महान ९६.६९, प्रो. जावेद खान क. महाविद्यालय महन ८१.२५, शिवाजी क.महा. राजंदा ८१.२५, आमीन उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय पिंजर ५९.०९, संत बबनाजी महाराज क.महा. काजळेश्वर ६७.३४, वसराम आडे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा साखरवीरा ९२.२४, संत तुकडोजी महाराज उच्च माध्यमिक आश्रमशाळा परंडा ९६.२५ टक्के, वेणुताई बिडकर कनिष्ठ कला महाविद्यालय सिंदखेड ७०.७६ टक्के, विठाई क.महा. खेर्डा बु. ८५.१६, ब्ल्यू बर्ड क. महा. कातखेड १०० टक्के, ज्ञानप्रकाश कनिष्ठ महाविद्यालय पिंजर ६७.५६ तर गुलाम नबी आझाद कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी व्होकेशनलचा ८६.३१ टक्के निकाल लागला.