टाकळी पोटे हत्याकांडातील आरोपी बापलेक बारा तासात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:16 AM2021-04-14T04:16:38+5:302021-04-14T04:16:38+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अकोला : मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशीच्या पहाटे बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी पोटे येथे ...

Baplek, accused in Takli Pote murder, arrested in 12 hours | टाकळी पोटे हत्याकांडातील आरोपी बापलेक बारा तासात जेरबंद

टाकळी पोटे हत्याकांडातील आरोपी बापलेक बारा तासात जेरबंद

googlenewsNext

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अकोला : मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशीच्या पहाटे बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी पोटे येथे एकाची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासाच्या आत ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना सुकळी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी या आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

टाकळी पोटे येथील रहिवासी विठ्ठल नथूजी ठाकरे हे मंगळवारी सकाळी शेतात असताना या गावातील रहिवासी योगेश हरिभाऊ जळमकर व हरिभाऊ लक्ष्मण जळमकार या बापलेकाने त्यांच्या शेतात जाऊन विठ्ठल ठाकरे यांची धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या केली. या हत्याकांडाची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. या प्रकरणी गोविंदा नथूजी ठाकरे यांच्या तक्रारीवरून योगेश जळमकार व त्याचे वडील हरिभाऊ जळमकार या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील आरोपी फरार होताच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पथकाने तपास सुरू केला. या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी बापलेकास सुकळी नंदापूर येथून अटक केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक.......... ची......... श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप काटकर, शंकर डाबेराव, विशाल मोरे, संदीप तवाडे, लीलाधर खंडारे, रवी पालीवाल, अनिल राठोड, सायबर सेलचे गणेश सोनणे............... यांनी केली.

Web Title: Baplek, accused in Takli Pote murder, arrested in 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.