शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठणाची माहिती देण्यास बँकांची टाळाटाळ

By admin | Updated: June 10, 2015 02:10 IST

शासन गंभीर; १६ जून रोजी बोलावली आढावा बैठक.

अकोला : शेतकर्‍यांच्या कर्ज पुनर्गठणाबाबत शासन गंभीर असून, यासंदर्भात १६ जून रोजी आढावा बैठक बोलाविण्यात आली आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक जिल्ह्यातील सर्व बँकांची कर्जवाटपासंबंधी माहिती घेतली जात असली, तरी बँका मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप व रबी या दोन्ही हंगामांमध्ये शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. दोन्ही हंगामात उत्पादनात घट आल्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला. त्यातच बँकांकडून कर्जवसुलीचा तगादा सुरू होता. कर्ज कसे भरावे, या चिंतेत शेतकरी होते. शेतकर्‍यांकडे कर्ज भरण्यासाठी पैसेच नव्हते. त्यामुळे शासनाने यावर्षी मागील कर्ज न भरता त्याचे पुनर्गठण करीत नवीन कर्ज देण्याची घोषणा केली. त्यामुळे सुखावलेले शेतकरी आता बँकांमध्ये जाऊन कर्ज पुनर्गठणासाठी गर्दी करीत आहेत. शासनाने कर्ज पुनर्गठणाचा निर्णय घेतला असला तरी बँका मात्र उदासीन आहेत. आतापर्यंत संपूर्ण राज्यात १५ टक्क्यांच्या जवळपास कर्जाचे पुनर्गठण झाले आहे. त्यामुळे याबाबत गंभीर होऊन मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठण न करणार्‍या बँकांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली आणि १६ जून रोजी मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील कर्ज पुनर्गठणाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याकरिता लीड बँकांकडून जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कर्ज पुनर्गठणाबाबतची माहिती मागविण्यात आली आहे; मात्र बँकांच्यावतीने माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

*पत्रांनाही केराची टोपली

        कर्ज पुनर्गठणाबाबत माहिती देण्यासाठी लीड बँकेच्यावतीने जिलतील बँकांना वारंवार पत्र देण्यात येत आहे; मात्र त्यानंतरही बँकांच्यावतीने पुनर्गठणाबाबत माहिती दिली जात नाही, हे विशेष.