शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

बाळापूर : ‘पीएसआय’च्या अंगावर घातले वाहन; आरोपीला सिनेस्टाइल पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:24 AM

बाळापूर :  प्रवासी वाहनांमध्ये  अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून सदर वाहन अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस उपनिरिक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन घालुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री झाला. या घटनेत विठ्ठल वाणी खाली पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

ठळक मुद्देगुरांच्या अवैध वाहतुकीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर :  प्रवासी वाहनांमध्ये  अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून सदर वाहन अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस उपनिरिक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन घालुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री झाला. या घटनेत विठ्ठल वाणी खाली पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूरकडून दोन प्रवासी वाहनांमध्ये  अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून अकोलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी २६ डिसेंबरच्या रात्री एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने एक वाहन पकडले. परंतु, दुसर्‍या वाहन चालकाने  पोलिसांना चकवून वाहन वेगाने बाळापूरकडे  पळविले. ही माहिती अकोलाच्या पोलीस नियंत्रण कक्षाने बाळापूर पोलिसांना दिली. या माहितीवरून रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी  मार्गावर नाकेबंदी करून, भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन  विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घातल्याने ते बाजूला खाली पडले. त्यावेळी त्या भरधाव वाहनाचा पाठलाग करून, बाळापूर शहरात पोलिसांनी सदर वाहनाला घेरून पकडले. यामध्ये घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. परप्रांतातून अमरावती मार्गे गुरांची वाहतूक करण्यासाठी अमरावतीमधील मंगेश रमेश वानखडे यांच्या एमएच २२ डी २५५५ क्रमांकाच्या दोन प्रवासी वाहनामध्ये पाच गुरे भरून ती बाळापूरमध्ये पोहोचवण्यासाठी चालक शे. अजीज शे. वजीर (३५) व शे. एहेसान शे. अमन (३३) रा. लाल ताजनगर, अमरावतीवरून रात्री उशिरा निघाले. ही माहिती अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांना मिळाल्याने त्यांनी मंगळवारी रात्री ४ वाजता नाकेबंदीत एक वाहन अकोल्याला पकडले. या कारवाईच्या वेळेस तेथून पळ काढलेल्या वाहनाने बाळापूरजवळ नाकाबंदी करणार्‍या पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाणी जीव वाचवताना गंभीर जखमी झाले. त्यांनी जखमी अवस्थेतही पळून जाणार्‍या वाहनाचा पाठलाग सुरू केला असता त्यांचे पोलीस वाहन उलटता-उलटता वाचले. पसार झालेले वाहन बाळापुरात जाताच दोन्ही बाजूने पोलिसांच्या वाहनांनी लाल सवारी परिसरात सदर वाहन पकडले. यामधील पाचही गुरांची सुटका करून उपचारासाठी गोशाळेत पाठविले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. गुरांची अवैध वाहतूक करणारा टाटा सुमो चालक शे. अजीज शे. वजीर व वाहक शे. अहेसान शे. अमन यांना बुधवारी बाळापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत तीन दिवसपर्यंत पोलीस  कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूरचे ठाणेदार  विनोद ठाकरे व हे. काँ. शुध्दोधन इंगळे  करीत आहेत. 

आरोपींवर रोखले पिस्तूलया घटनेतील दोन आरोपीं पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलीस कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने पोलीस उपनिरीक्षक वाणी यांनी शेवटी त्यांच्याजवळील पिस्तूल काढून आरोपीवर रोखून दोन्ही आरोपींसह सदर वाहन बाळापूर पोलीस स्टेशनला आणले व उपरोक्त दोन्ही आरोपींना अटक केली. 

टॅग्स :BalapurबाळापूरCrimeगुन्हा