शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर तालुक्यातील ८७ गावांत होतोय अशुद्ध पाण्याचा पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:17 IST

बाळापूर : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, कर्मचारी भूगर्भातून उपसा केलेले पाणी शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया न करता थेट नळाद्वारे ग्रामीण भागात अशुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करीत आहेत.

ठळक मुद्दे६६ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात फिल्टर नाही

अनंत वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या ८७ गावांत पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत भूगर्भातील पाणी आहे. बाळापूर शहराची पाणी पुरवठा योजना वगळता ग्रामीण भागात कुठेही धरणातून पाणी पुरवठा नाही. भूगर्भात (विहीर, बोअरवेल)द्वारे पाणी हे पाणी पुरवठय़ाच्या टाकीत टाकून ते साठवले जाते. त्या पाण्याच्या जलशुद्धीकरणासाठी स्थानिक ग्रामपंचायतमार्फत ब्लिचिंग पावडर, तुरटी टाकून शुद्ध झालेले पाणी नळाद्वारे नागरिकांना पिण्यासाठी सोडण्याची प्रक्रिया असते; परंतु ग्रामपंचायत व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, कर्मचारी मात्र भूगर्भातून उपसा केलेले पाणी शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया न करता व कुठेही विहीर, बोअरवेलमध्ये ब्लिचिंग पावडर न टाकता अथवा शुद्धीकरण यंत्र न बसवता ग्रामीण भागात थेट नळाद्वारे अशुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करीत आहेत.तालुक्यातील मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पारस, कन्हेरी (गवळी) येथे बाळापूरवरून मन नदीच्या पात्राशेजारी मोठय़ा विहिरी खोदून पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होतो. वाडेगाव येथेही बाहेरून पाणी पुरवठा होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाणी खेचणार्‍या यंत्राद्वारे पाणी खेचून पाण्याच्या टाकीत पोहोचत नसल्याने अनेक गावांत पाणी पुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. भूगर्भातून थेट पाणी पुरवठा करणार्‍या पाइपद्वारे नागरिकांना नळाद्वारे पाणी सोडले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. शासनाकडून संभाव्य पाणीटंचाई निवारण्याच्या योजनावर मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. शासनाने अनेक गावांत दीर्घकालीन पाणी पुरवठा योजना राबवल्या. पारस, वाडेगाव, कान्हेरी, खिरपुरी, मनारखेडसारख्या गावात राबवलेल्या योजना कुचकामी ठरल्या.तालुक्यात नैसर्गिक देण म्हणून पाच मोठय़ा नद्या-नाले आहेत; परंतु शासन व लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठय़ासाठी नियोजनच केले नाही. त्यामुळे दरवर्षी भरपूर पाऊस होवो अथवा न होवो पाणीटंचाई ही नित्याचीच बाब झाली आहे. पाणीटंचाई नैसर्गिक असली, तरी त्यावर मात करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाची आहे. दरवर्षी पाणीटंचाईच्या नावाखाली प्रत्येक ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करतो; परंतु एकाही ग्रा.पं.ने गावासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा (फिल्टर प्लांट) उभारला नाही. पाणी शुद्धीकरण यंत्र न बसविल्याने व पाणीटंचाईचे कारण पुढे करून पाणी खेचणार्‍या मशिनरीवर ताण पोहोचत असल्याने तांत्रिक कारण पुढे करून शुद्धीकरण (ब्लिचिंग, तुरटी)चा खर्च वाचवून मात्र नागरिकांना दूषित पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भाग हा खारपाणपट्टय़ात येतो. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी, पोटाच्या आजारात वाढ होत आहे. अनेकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. ग्रामीण भागातील आजार नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पाण्याचे नमुने प्रयोगशाळेला वारंवार पाठवत असते. आलेल्या नमुन्याची माहिती गटविकास अधिकार्‍यांमार्फत ग्रामसेवकांना लेखी पत्र दिले जाते; परंतु लाल, पिवळ्या रंगाच्या दूषित पाण्यावर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना राबविणार्‍या यंत्रणा उपाययोजना करण्याऐवजी ग्रामस्थांना पाणीटंचाईचे कारण पुढे करून पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी झिडकारून ग्रामस्थांना स्वत:च्या घरात आर.ओ. लावण्याचा केविलवाणा सल्ला मात्र देतात.पारस प्रकल्पांतर्गत २0१४-१५ मध्ये प्रकल्प बाधित पारस, मांडोली, कोळासा, मनारखेड, सातरगाव, भिकुंडखेड, शेळद, मांडवा गावांना प्रकल्पाच्या सीएसआर फंडातून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येईल, असे दिलेले आश्‍वासन देणारे व ग्रामपंचायतचे पदाधिकारीही विसरले; मात्र जलशुद्धीकरण यंत्र अद्यापही लागले नाही. तालुक्यात कारंजा (रमजानपूर) येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमार्फत १0 गावांना पाणी पुरवठा केला जातो. लोहारा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून लोहारा व कवठा गावाला पाणी पुरवठा केला जातो. निंबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून वझेगाव, निंबा गावाला पाणी पुरवठा केला जातो. 

भूगर्भातील पाण्यावर निर्भर असलेली गावेवाडेगाव, पारस, टाकळी (खोजबोड), काझीखेड, स्वरूपखेड, मोरवा, जानोरी, कान्हेरी (गवळी), उरळ बु., उरळ खु., धनेगाव, व्याळा, पिंपळगाव, तांदळी, शेळद, खिरपुरी बु., खिरपुरी खु., खामखेड, मोरगाव (सादीजन), खंडाळा, चिंचोली गणू, नांदखेड, मोरझाडी, अंत्री (मलकापूर), कोळासा, कुपटा, मांडवा, सातरगाव, गायगाव, निमकर्दा, कवठा, लोहारा, बटवाडी बु., नागद, मालवाडा, दगडखेड, सागद, हातरुण, टाकळी (निमकर्दा), मनारखेड, बोरगाव (वैराळे), सोनाळा, मांजरी, नकाशी, भरतपूर, कळंबी (महागाव), कळंबी खु., रिधोरा, दधम, बटवाडी खु., देगाव, मानकी, वझेगाव, हाता, डोंगरगाव, नया अंदुरा, अंदुरा, शिंगोली, निंबा फाटा या ठिकाणी जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) आहेत. त्यातील बहुतांश क्षेत्र खारपाणपट्टय़ात असताना पाण्याच्या टाकीत पाणी भरून ते शुद्धीकरण न करता परस्पर टाकी न भरता सरळ नळाद्वारे सोडण्यात येत आहे. 

टॅग्स :BalapurबाळापूरWaterपाणी