शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिमसह बाळापूरचा गुंता कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:37 PM

अकोला पश्चिम व बाळापूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा गुंता कायमच असल्याचे संकेत आहेत.

- राजेश शेगोकारअकोला : विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी निश्चित असून, २८८ जागांपैकी दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी १०० जागांबाबतची बोलणी संपली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या १०० जागांमध्ये अकोल्यातील अकोट, अकोला पूर्व व मूर्तिजापूरचा समावेश असून, दोन्ही पक्षांचा प्रबळ दावा असलेल्या अकोला पश्चिम व बाळापूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा गुंता कायमच असल्याचे संकेत आहेत.२००९ च्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या सूत्रानुसार राष्टÑवादी काँग्रेसने केवळ मूर्तिजापूर हा एकमेव मतदारसंघ लढविला होता. आता मात्र अकोल्यातील पाचपैकी दोन मतदारसंघांसाठी राष्टÑवादी काँग्रेस आग्रही आहे. यापैकी मूर्तिजापूर हा मतदारसंघ जागा वाटपात राष्टÑवादीसाठी देण्यात आल्याची माहिती आहे.अकोला पश्चिम हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य गतवेळच्या तुलनेत यावेळी वाढलेले दिसून आले, तर भाजपाने सर्वच मतदारसंघांत घेतलेल्या आघाडीमध्ये सर्वात कमी आघाडी या मतदारसंघात होती. त्यामुळे काँग्रेसच्या या परंपरागत मतांची मोट बांधून विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांची मोठी फळी या मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे, मुस्लीम समाजातील राज्यातील दिग्गज नेतेही या मतदारसंघावर डोळा ठेवून आहेत. गतवेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार दुसºया तर काँग्रेसचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता. त्यामुळे काँग्रेस, राष्टÑवादी आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसला देण्यात यावा, असा दावा समोर आला आहे. दुसरीकडे बाळापूर या मतदारसंघात काँग्रेसचा सातत्याने होणारा पराभव पाहता आता या मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसला संधी देण्याची मागणी राष्टÑवादीमधून होत आहे. त्यामुळे आगामी जागा वाटपाच्या चर्चेत या दोन मतदारसंघांपैकी राष्ट्रवादीचा कोणत्या मतदारसंघावरचा दावा मान्य केला जातो, यावरच पुढील राजकारणाची गणिते ठरणार आहेत. उमेदवारीसाठी रंगणार स्पर्धामूर्तिजापूर या मतदारसंघात राष्टÑवादीकडे उमेदवारांची मोठी स्पर्धा असून, काँग्रेसकडे त्या तुलनेत उमेदवारांची दावेदारी कमी आहे. त्यामुळे जागा वाटपातील पहिल्याच टप्प्यात राष्टÑवादीला हा मतदारसंघ देण्यात आल्याचे समजते. अकोट, अकोला पूर्व या दोन मतदारसंघांत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. आज भाजप इच्छुकांच्या मुलाखतीजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवार, २ सप्टेंबर रोजी मुलाखती होत आहेत. भाजपचे पक्ष निरीक्षक ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक इच्छुक उमेदवारासोबत चर्चा करणार आहेत.

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाcongressकाँग्रेस