लैंगिक शोषण प्रकरणातील बाळापूरच्या आरोपीने काढला पळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:01+5:302021-04-30T04:24:01+5:30

विनोद श्यामराव वानखेडे (४२) असे आरोपीचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मांडोली (पो. पान्हेरी) येथील रहिवासी आहे. ...

Balapur accused in sexual abuse case escapes! | लैंगिक शोषण प्रकरणातील बाळापूरच्या आरोपीने काढला पळ!

लैंगिक शोषण प्रकरणातील बाळापूरच्या आरोपीने काढला पळ!

विनोद श्यामराव वानखेडे (४२) असे आरोपीचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मांडोली (पो. पान्हेरी) येथील रहिवासी आहे. आरोपी विनोद शामराव वानखेडे याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपी विनोद वानखेडे हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याला कोरोना संसर्ग झाल्याने, बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील सिंहगड इमारतीत असलेल्या तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र २९ एप्रिल रोजी पहाटे ५:४५ वाजेच्या सुमारास आरोपी शौचालयास गेला. त्याने तेथील लोखंडी गज तोडून पलायन केल्याची तक्रार प्रभारी कारागृह अधीक्षक भी. ना. राऊत यांच्यातर्फे पोलीस कर्मचारी किरण माने यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच ते सात दिवसापूर्वी आरोपीने फिनाईलही प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Web Title: Balapur accused in sexual abuse case escapes!