खंडणीप्रकरणी आरोपींना जामीन

By Admin | Updated: June 6, 2014 01:18 IST2014-06-05T19:40:35+5:302014-06-06T01:18:23+5:30

आकोट न्यायालयाने खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Bail to accused in ransom case | खंडणीप्रकरणी आरोपींना जामीन

खंडणीप्रकरणी आरोपींना जामीन

आकोट : ताब्यात घेतलेली दुकाने परत करण्यासाठी खंडणी मागण्याच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना आकोट न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. खंडणी मागितल्याप्ररकणी भाजप नगरसेवक मंगेश चिखले, अशोक म्हसाळ, सागर बोरोळे तथा अन्य १० जणांविरुद्ध आकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ५ जून रोजी सदर आरोपी आकोट न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मालविय यांच्या समक्ष हजर झाले. आरोपींची बाजू समजून घेऊन न्यायालयाने तीनही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपींतर्फे ॲड. थानवी अकोला यांनी काम पाहिल. आरोपींना जामीन मिळाला असला तरी अन्य १० जणांचा अद्याप शोध घेणे सुरू आहे. त्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, याबाबत नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Bail to accused in ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.