शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अकोला महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 5:31 PM

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींना यश मिळणार का, असा प्रश्न सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत.

- आशीष गावंडे

अकोला: गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. शहरातील विकास कामांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला तरी सदर कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेत सक्षम अधिकारीच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील निर्माणाधीन विकास कामांचा दर्जा काय, असा प्रश्न उपस्थित होण्यासोबतच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींना यश मिळणार का, असा प्रश्न सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत.केंद्रात आणि राज्यात भाजपाने सत्ता मिळवल्यानंतर अकोलेकरांनी महापालिकेची सत्ता भाजपाकडे सोपवली. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. त्यात भरीस भर म्हणून अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघही भाजपाच्या ताब्यात सोपवला. भाजपाकडे एकहाती सत्ता दिल्यास शहरातील विकास कामे झटपट निकाली निघतील, असा अकोलेकरांना विश्वास होता. शहरातून भाजपाचे दोन आमदार असून, योगायोगाने नगर विकास राज्यमंत्री पदही अकोल्याच्या वाटेला आले आहे. शासनाच्या स्तरावर भाजप लोकप्रतिनिधींचा बोलबाला दिसत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळी असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. त्याचा गैरफायदा कंत्राटदारांकडून घेतला जात आहे. आज रोजी मनपातील एक उपायुक्त पद मागील दहा महिन्यांपासून रिक्त आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, मुख्य लेखा परीक्षक, शहर अभियंता, नगररचनाकार यांच्यासह सुमारे डझनभर पदे रिक्त आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासनाकडे वारंवार शिफारस केल्यावरही शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मनपात उपायुक्त पदावर सुमंत मोरे नियुक्त झाले. सद्यस्थितीत त्यांच्याकडे उपायुक्त प्रशासन व उपायुक्त विकास अशा दोन्ही पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय अधिकाºयांवरचा ताण वाढत असला तरी सत्ताधाºयांना त्याचे काहीही सोयरसूतक नसल्याचे चित्र आहे. एकूणच भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय वाईट परिस्थितीतून वाटचाल सुरू असल्याने रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील का, असा प्रश्न सर्वसामान्य अकोलेकर विचारत आहेत.

ही पदे आहेत रिक्त!उपायुक्त ०१सहायक आयुक्त ०२उपसंचालक नगररचना ०१सहा. संचालक नगररचना ०१मुख्य लेखा परीक्षक ०१मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी ०१मुख्य अग्निशमन अधिकारी ०१शहर अभियंता ०१कार्यकारी अभियंता (साबांवि) ०१उपअभियंता ०१आरोग्य अधिकारी ०१सहा. मूल्य निर्धारण अधिकारी ०१

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका