बाळापूर : चुलत भावाने केला विवाहित बहिणीचा विनयभंग; भावाविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:33 IST2017-12-25T21:26:51+5:302017-12-25T21:33:54+5:30

बाळापूर : बाळापूर शहरात माहेरी राहणा-या विवाहित बहिणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी  बाळापूर पोलिसांनी तिच्या चुलत भावाविरुध्द गुन्हा  दाखल केला आहे. 

Baburam: Molestation of married sister by cousin; A complaint against a cousin | बाळापूर : चुलत भावाने केला विवाहित बहिणीचा विनयभंग; भावाविरुध्द गुन्हा दाखल

बाळापूर : चुलत भावाने केला विवाहित बहिणीचा विनयभंग; भावाविरुध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्देबहिणीच्या मोबाईलवर पाठवित होता अश्लील मॅसेजबहिणीने जाब विचारला असता, केला विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : बाळापूर शहरात माहेरी राहणा-या विवाहित बहिणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी  बाळापूर पोलिसांनी तिच्या चुलत भावाविरुध्द गुन्हा  दाखल केला आहे.
 सदर विवाहित महिला दोन मुला,मुलीसह माहेरी राहते . या महिलेवर घराच्या  बाजूला  राहणारा ३५ वर्षीय चुलत भाऊ  मागील काही दिवसांपासून चुलत बहिणीच्या मोबाईलवर त्याच्या मोबाईलमधून व्हॉटस अ‍ॅपद्वारे निनावी अश्लील मॅसेज पाठवत होता. हा मेसेज पाठवणारा व्यक्ती कोण आहे यासाठी तिने ट्रू कॉलरवरून त्याचा मोबाईल नंबर तपासला असता तो मोबाईल तिच्या घराशेजारी राहणा-या चुलतभावाचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिने त्याला अश्लिल मेसेज का पाठवितोस असे विचारले असता त्याने  तिचा हात पकडून त्याच्याशी लग्न कर अशी मागणी करीत तिचा  विनयभंग  केला. त्यामुळे सदर विवाहित महिलेने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तिच्या चुलत भावाविरुद्ध रीतसर फिर्याद  दाखल केली. सदर  महिलेच्या फिर्यादीवरून बाळापूर  पोलिसांनी तिच्या चुलतभावाविरुद्ध  भा.दं.वि. च्या ३५४ (ब) , आयडी कायद्याच्या ३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला असून  पुढील तपास  ठाणेदार विनोद  ठाकरे करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Baburam: Molestation of married sister by cousin; A complaint against a cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.