महात्मा फुले जयंती कार्यक्रमात बाप-लेकाचा धुमाकूळ; एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:17 AM2021-04-12T04:17:44+5:302021-04-12T04:17:44+5:30

हातगाव ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरू होता. येथील सुरेश पुंडलिक जोगळे व ...

Baap-leka dhumakul in Mahatma Phule Jayanti program; Beating one | महात्मा फुले जयंती कार्यक्रमात बाप-लेकाचा धुमाकूळ; एकाला मारहाण

महात्मा फुले जयंती कार्यक्रमात बाप-लेकाचा धुमाकूळ; एकाला मारहाण

Next

हातगाव ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरू होता. येथील सुरेश पुंडलिक जोगळे व त्यांचा मुलगा अक्षय जोगळे यांनी ग्रामपंचायतमधील आयोजित कार्यक्रमात येऊन धुमाकूळ घातला व दिग्विजय गाढेकर यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, अक्षय जोगळे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करून गावात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरपंच अक्षय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. अक्षय जोगळे हा उपसरपंच निवडणुकीत पराभूत झाला. पराभव जिव्हारी लागल्याने दिग्विजय गाढेकर यांच्यावर संतप्त बाप-लेकाने सहकाऱ्यांसह हल्ला चढविला. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध ३२४, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Baap-leka dhumakul in Mahatma Phule Jayanti program; Beating one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.