अॅक्सल तुटल्याने ट्रक खड्ड्यात फसले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:33 IST2017-07-18T01:33:34+5:302017-07-18T01:33:34+5:30
वाडेगाव येथील घटना : जीवित हानी टळली!

अॅक्सल तुटल्याने ट्रक खड्ड्यात फसले!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : गावातून गेलेल्या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामधून जात असताना दोन ट्रकचे एक्सल तुटले. त्यामुळे, हे ट्रक खड्ड्यात फसले. ही घटना सोमवारी घडली. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नाही.
बाळापूर ते पातूर रस्त्याची गेल्या चार महिन्यांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या बाजूने नाली काढण्यात आली नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरच साचते. त्यामुळे, वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. सोमवारी या रस्त्यावरून जात असलेल्या दोन ट्रकचे एक्सल तुटले. त्यामुळे, हे ट्रक रस्त्याच्या मध्येच बंद पडले. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांची रांग लागली होती. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.