शासकीय याेजनांची कलापथकाद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:40+5:302021-02-05T06:18:40+5:30

पालकमंत्र्यांची डिजिटल राहुटी’ उपक्रम अकोला : खेड्यापाड्यातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांना विविध सेवा देणे, त्या माध्यमातून त्यांच्या ...

Awareness of government schemes through art troupe | शासकीय याेजनांची कलापथकाद्वारे जनजागृती

शासकीय याेजनांची कलापथकाद्वारे जनजागृती

पालकमंत्र्यांची डिजिटल राहुटी’ उपक्रम

अकोला : खेड्यापाड्यातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांना विविध सेवा देणे, त्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने ‘पालकमंत्र्यांची डिजिटल राहुटी’ हा एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्याचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे हस्ते करण्यात आला.

ना. कडू व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील कळंबेश्वर व माझोड येथील नागरिकांशी दुरस्थ प्रणालीद्वारे थेट संवाद साधला. त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे मनोगतही जाणून घेतले.

या वेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. नीलेश अपार, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी अधिकारी सहभागी झाले होते.

याप्रसंगी बोलताना ना. कडू यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व नव्या तंत्रज्ञानाचा वापर हा उत्तम प्रशासनासाठी आणि लोकांच्या समस्या व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. याद्वारे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासू नये.

या उपक्रमासाठी परिश्रम घेणारे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना या वेळी ना. कडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

Web Title: Awareness of government schemes through art troupe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.