वाडेगाव येथील शेतकरी पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:16+5:302021-04-03T04:15:16+5:30

--------------------------------------- घरकुल बांधकामाची रक्कम वाढविण्याची मागणी बाळापूर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे सुरू आहेत. सध्या महागाईमुळे घर बांधण्याच्या ...

Awarded Farmers Award at Wadegaon | वाडेगाव येथील शेतकरी पुरस्काराने सन्मानित

वाडेगाव येथील शेतकरी पुरस्काराने सन्मानित

---------------------------------------

घरकुल बांधकामाची रक्कम वाढविण्याची मागणी

बाळापूर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे सुरू आहेत. सध्या महागाईमुळे घर बांधण्याच्या साहित्यात भरमसाट वाढ झाली आहे. घरकुल योजनेंतर्गत अनुदान कमी असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे घरकुल बांधकामाची रक्कम वाढवून देण्याची मागणी तालुक्यातील लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली.

--------------------------------------------------

बाजार समितीत तुरीची आवक वाढली

अकोट : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गत आठवड्यापासून तुरीची आवक वाढली आहे. गत आठवड्यापासून बाजारात पाच ते सहा क्विंटलची रोज आवक होत आहे. तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी विक्री करीत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------------

बाजारात कैरीला ग्राहकांची पसंती

वाडेगाव : उन्हाचा प्रकोप वाढत असल्याने, बाजारात कैरीची आवक वाढली असून, परिसरातील गावकरी कच्च्या कैऱ्यांना पसंती देत आहेत. येथील बाजारात ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे कैरी विकली जात आहे.

--------------------------------------

तेल्हारा शहरात मूलभूत सुविधांचा अभाव

तेल्हारा : शहरातील काही भागांत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शहरातील विविध समस्यांकडे पालिका प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पिण्याचे पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे.

--------------------------------------

रोहित्र बंद; शेतकरी त्रस्त

वाडेगाव : परिसरातील सस्ती भागात विद्युत डीपी काही दिवसांपासून बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांचा कृषिपंप वीजपुरवठा खंडित झाला आहे. या भागातील बागायती, भाजीपाला पिकांचे ओलिताअभावी नुकसान होत आहे. याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------

नियमित कर्जदारांना अनुदान केव्हा?

मूर्तिजापूर : कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. मात्र, वर्षभरानंतरही शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान प्राप्त झाले नाही. तशा हालचालीदेखील शासकीय स्तरावर दिसून येत नाही. घोषित अनुदान मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरत आहे. शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आहेत, त्याची नीट अंमलबजावणी नाही. मंत्री स्तरावर रोज बैठकांचे सत्र सुरू असून याबाबत त्वरित विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे. शासनाचे आर्थिक वर्ष संपुष्टात येऊन तसेच अंदाजपत्रकात तरतूद असताना अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यांत ५० हजार सानुग्रह वळती केलेली नाही.

----------------------------------------------------

अडगाव-पंचगव्हाण मार्गावर दुतर्फा वाढली झुडपे!

अडगाव बु. : अडगाव-पंचगव्हाण-तेल्हारा मार्गावर अनेक झुडपी वनस्पतींनी रस्त्यावर अतिक्रमण केले असून, रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी सदर मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते.

---------------------------------------

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला !

बार्शीटाकळी : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत आहे. शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

-----------------------------------------

कंचनपूर-लोणाग्रा रस्ता ठरतोय धोकादायक

हातरूण : परिसरातील कंचनपूर-लोणाग्रा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गाने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

-------------------------------------------

टाकळी परिसरात रोहयो कामाची मागणी

बाळापूर : तालुक्यातील टाकळी खुरेशी परिसरात खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामात उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या परिसरात काम नसल्याने युवकांची भटकंती होत आहे. त्यामुळे परिसरात रोहयो काम उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------

वीज खांब देत आहे अपघाताला आमंत्रण

बार्शीटाकळी : शहरातील काही भागांमध्ये अनेक वर्षांपासून वीज खांब उभा आहे. मात्र या खांबाला खालच्या भागाला गंज चढल्यामुळे खांब पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. या विजेच्या खांबाच्या सभोवताली तारा लावल्या आहेत. एखाद्या वेळी खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.

------------------------------------------------

अकोटात मोकाट जनावरांचा मुक्त संचार

अकोट : शहरातील मुख्य चौकांमध्ये दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसा व रात्री मोकाट जनावरे वावरत आहेत. नागरिकांना त्रास होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------------

भाजीपाल्याच्या दरात घसरण, शेतकरी त्रस्त

खेट्री : परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची शेती केली जाते. भाजीपाल्याचे दर एकदमच कमी आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाण्यांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना शेती परवडण्याजोगी नाही. वांगे १० ते १५ रुपये किलो, मिरची २० रुपये विक्री होत आहे. दरात सतत चढउतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: Awarded Farmers Award at Wadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.