शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

अकोल्यात जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धा: जिल्हाधिकारी कार्यालय संघाची विजयी सलामी

By atul.jaiswal | Published: February 06, 2018 6:29 PM

अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजता जिमखाना क्रिकेट क्लब मोठी उमरी येथे करण्यात आला.

ठळक मुद्देस्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजता जिमखाना क्रिकेट क्लब मोठी उमरी येथे करण्यात आला.पहिला सामना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालय व परिवहन अधिकारी पलंगे यांच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दरम्यान खेळला गेला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ठेवलेले ९७ धावांचे लक्ष्य जिल्हाधिकारी कार्यालय संघाने एक गडी गमावून सहज गाठले

अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजता जिमखाना क्रिकेट क्लब मोठी उमरी येथे करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, उपसंचालक सामाजिक वनीकरण विजय माने, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, राज्य परिवहन महामंडळाचे पलंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जागरूक मतदार चषक क्रिकेट सामन्यांचा पहिला सामना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालय व परिवहन अधिकारी पलंगे यांच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दरम्यान खेळला गेला. नाणे फेक जिंकून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी सर्व बाद ९७ धावा काढल्या. जिल्हाधिकारी संघातर्फे सिद्दू जंजाळ, वैभव फरतारे, सुबोध गावंडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जिल्हाधिकारी संघातर्फे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी उत्कृष्ठ क्षेत्र रक्षण केले. जिल्हाधिकारी कार्यालय संघाकडून आस्तिक कुमार पाण्डेय व नितीन शिंदे यांनी डावाची सुरूवात केली. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जलद गतीने फलंदाजी करून दोन षटकार व ९ चौकारासह नाबाद ६० धावा चोपल्या. नितीन शिंदे यांनी २८ धावा केल्या. हा सामना जिल्हाधिकारी कार्यालय संघाने ९ गडी राखत जिंकला. सामनावीर म्हणून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना घोषित करण्यात आले.सामन्यांचे पंच म्हणून चन्नकेशला व सावकर हे होते.

जिल्हाधिकाऱ्यांची आकर्षक खेळीमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ठेवलेले ९७ धावांचे लक्ष्य जिल्हाधिकारी कार्यालय संघाने एक गडी गमावून सहज गाठले. यामध्ये कर्णधार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचा मोलाचा वाटा राहिला. जिल्हाधिकाºयांनी दोन षटकार व ९ चौकारासह नाबाद ६० धावांची नाबाद खेळी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आकर्षक खेळीने उपस्थितांची मने जिंकली.१२ संघांचा सहभाग६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होणार असलेल्या जागरूक मतदार क्रिकेट चषक स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालय, महसुल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, विधीज्ञ अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , कार्यकारी अभियंता महावितरण, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, पत्रकार संघ यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयCricketक्रिकेट