गणेशोत्सवात टाळा विजेचे विघ्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:44 IST2017-08-27T19:43:39+5:302017-08-27T19:44:55+5:30
सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीज पुरवठा घेतला जातो. पण, हा वीज पुरवठा अधिकृतपणे तात् पुरत्या वीज जोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक मंडळांचे आद्यक र्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकोडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीज पुरवठा हा कोणत्याही क्षणी कोण त्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीज पुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. सुरक्षेचे नियम पाळून गणेशोत्सवात विजेचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेशोत्सवात टाळा विजेचे विघ्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीज पुरवठा घेतला जातो. पण, हा वीज पुरवठा अधिकृतपणे तात् पुरत्या वीज जोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक मंडळांचे आद्यक र्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकोडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीज पुरवठा हा कोणत्याही क्षणी कोण त्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीज पुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. सुरक्षेचे नियम पाळून गणेशोत्सवात विजेचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजवहन यंत्रणा हवी सदोष!
सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक मंडळी श्रीगणेशाच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोष, धोकाविरहित असणे आवश्यक आहे. याशिवाय गणेशोत्सवात पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टीनचा वापर होत असल्याने वायर लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या; पण टेपने जोडलेल्या असल्यास वीज पुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्य ता असते.
देखावे तयार करताना घ्या काळजी!
सार्वजनिक ठिकाणी देखावे तयार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांच्या या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अं तरावर देखावे तयार करण्यास प्राथमिकता दिली पाहिजे.
वीज पुरवठा व जनरेटरचे स्वतंत्र न्यूट्रल
अनेक सार्वजनिक मंडळे जनरेटरचा वापर करतात; परंतु वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू करण्यात येतो; परंतु एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असण्याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे अत्यावश्यक आहे.
मिरवणुकीतही राहा दक्ष!
श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. परंतु, या दरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या आदीं पासून मिरवणुकीत वाहने, देखावे व व्यक्ती सुरक्षित राहतील, याची काळजी घेतली पाहिजे. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास मंडळांच्या पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी महावि तरणच्या २४ तास सुरू असणार्या टोल फ्री क्रमांक १९१२, १८00२00३४३५ किंवा १८00२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.