सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी अविनाश देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:33+5:302021-02-05T06:20:33+5:30

बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष डॉ. अभय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाचे ...

Avinash Deshmukh as the President of Public Shiv Jayanti | सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी अविनाश देशमुख

सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी अविनाश देशमुख

बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष डॉ. अभय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय कौसल, मराठा महासंघाचे प्रदेश नेते विनायकराव पवार, प्रदीप खाडे, कपिल ढोके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश पदाधिकारी पंकज जायले, देवानंद टाले आदी उपस्थित होते. या बैठकीत उत्सव समितीच्या सचिवपदी चंद्रकांत झटाले यांची नियुक्ती केली असून, शाेभायात्रा प्रमुख पदाची सूत्रे पंकज जायले यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. हा उत्सव सफल करण्यासाठी निधी संकलन उपसमिती व अन्य उपसमित्यांच्या घटना प्रक्रियेवर विचार व्यक्त करण्यात आला. मुख्य सोहळ्यापर्यंत शिवसप्ताहात दर दिवशी अनेक कार्यक्रम केले जातील. शहरवासीयांनी या जयंती उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या वेळी ॲड. राजेश जाधव, मुरली कौसल, आनंद वानखडे, श्रीकांत ढगेकर, योगेश थोरात, नरेंद्र चिमणकर, अभिजित मोरे, डॉ. संजय धोत्रे, नितीन झापर्डे यांसह बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

शिवाजी पार्कचे नामकरण

शिवजयंती उत्सवाची बैठक आटाेपताच उपस्थितांच्या हस्ते शिवाजी पार्कचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ असे करण्यात आले. या वेळी जुना फलक हटविण्यात आला.

Web Title: Avinash Deshmukh as the President of Public Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.