शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यामुळे उलटलेल्या आॅटोरिक्षाखाली दबल्याने चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:06 IST

अकोला : अकोट फैलमधील भारत नगरमध्ये रस्त्यावरील प्रचंड खड्डयांमूळे आॅटो उसळला अन एका घरासमोर असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

अकोला : अकोट फैलमधील भारत नगरमध्ये रस्त्यावरील प्रचंड खड्डयांमूळे आॅटो उसळला अन एका घरासमोर असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या  अपघातात मोहम्मद तौसीफ मोहम्मद आसीफ उमर या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी नगरसेवकांचा घरावर मोर्चा नेताच ते पळून गेले. त्यानंतर आकोट फैल पोलिसांनी आॅटो चालकास अटक केली आहे.

अकोट फैलमधील भारत नगर परिसरातून एम एच ३० बीसी २२४९ क्रमांकाचा आॅटो भरधाव जात असतांना रस्त्यावरील खड्डयांवरून हा आॅटो उसळला. त्यानंतर घरासमोर बसुन असलेल्या मोहम्मद तौसीफ मोहम्मद आसीफ उमर या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर सदरचा आॅटो कोसळला. या आॅटोखाली चिमुकला दबल्याने त्याचा काही क्षणातच मृत्यू झाला. सदर आॅटो घरातील साहित्य घेउन जात होता. आॅटो चालक मोहम्मद जफर मोहम्मद मुजफ्फर याला घटनेनंतर अकोट फैल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. अकोट फैल पोलिसांनी आॅटो जप्त करून आॅटो चालक मोहम्मद जाफर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये नगरसेवकांच्या कामकाजाविषयी प्रचंड रोष निर्माण झाल्याने त्यांनी नगरसेवकांच्या घरावर मोर्चा नेताच नगरसेवक पळून गेले. त्यानंतर या नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा नेत प्रशासनाविरोधात नारेबाजी केली. नागरिकांचा रोष लक्षात घेता या ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाल्यातील पाणी रस्त्यावर आकोट फैल परिसरात बहुतांश भागातील नाल्यांची साफसफाई होत नसल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर येते. यामूळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्डयांमध्येही नाल्यातील पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्डयांचा अंदाज येत नसल्यामूळे या परिसरात रोजच अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 नगरसेवक पळाले अन मनपात मोर्चाआकोट फैल भारत नगरातील नागरिकांनी या घटनेनंतर प्रचंड नारेबाजी करीत नगरसेवकांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न करताच नगरसेवक घर सोडून पळून गेले. या परिसरातील रस्ते आता तरी दुरुस्त करा अशी घोषनाबाजी करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा महापालिकेवर धडकला.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातAkot Failअकोट फैलPoliceपोलिस