ऑटोरिक्षाची बसला धडक; पाच प्रवासी जखमी

By Admin | Updated: November 23, 2014 01:23 IST2014-11-23T01:23:53+5:302014-11-23T01:23:53+5:30

पातूर अकोला मार्गावरील अपघात.

Auto rickshaw hit; Five passengers were injured | ऑटोरिक्षाची बसला धडक; पाच प्रवासी जखमी

ऑटोरिक्षाची बसला धडक; पाच प्रवासी जखमी

चिखलगाव (अकोला) : पातूरहून अकोलाकडे जात असलेल्या ऑटोरिक्षाने आधी एका गाईला धडक दिली व नंतर विरुद्ध दिशेने येत असलेल्या बसवर धडकून रस्त्यावर उलटली. ही घटना अकोला-पातूर मार्गावरील नांदखेड ते चिखलगावदरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहि तीनुसार, शिरपूर जैन येथील एम. एच. ३७ बी. ६४५५ क्रमांकाची ऑटोरिक्षा काही प्रवाशांना घेऊन अकोल्याकडे जात असताना त्याची धडक रस्त्यात आडव्या आलेल्या गाईला लागली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व ऑटोरिक्षा अकोल्याहून पुसदकडे जात असलेल्या एम. एच. ३0 एम. ८२५९ क्रमांकाच्या बसवर जाऊन आदळली. नंतर रस्त्याच्या मधोमध उलटली. या अपघातात दोन महिला व तीन पुरुष प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारार्थ अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघा तात जखमी झालेल्या गाईचे मालक दिनकर उपर्वट यांनी पातूर पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे.

Web Title: Auto rickshaw hit; Five passengers were injured