पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळली; एक ठार, दोन गंभीर

By राजेश शेगोकार | Updated: September 23, 2022 10:37 IST2022-09-23T10:37:24+5:302022-09-23T10:37:42+5:30

विरुद्ध दिशेने आलेल्या एका अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने ऑटो थेट नदीपात्रात कोसळली.

Auto falls from bridge into riverbed; One killed, two seriously | पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळली; एक ठार, दोन गंभीर

पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळली; एक ठार, दोन गंभीर

अकोला : बाळापूर येथून कान्हेरी गवळी या गावाकडे प्रवासी घेऊन जात असलेला ऑटो राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वरील भिकुंड नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजताचे सुमारास घडली. या अपघातात एक जण ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बाळापूर येथून एम.एच. ३० पी ८७७९ क्रमांकाचा ऑटो गुुरवारी सकाळी कान्हेरी गवळी या गावाकडे प्रवासी घेऊन जात होता. पारस फाट्यानजीकच्या भिकुंड नदीच्या पुलावर आला असता विरुद्ध दिशेने आलेल्या एका अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने ऑटो थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात इम्रानशा लालशहा (७०) या प्रवाशाचा जागीच मुत्यु झाला. तर ऑटोचालक सुधाकर महादेव बेलसरे (४५ ) व जानराव भिकाजी वानखडे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Auto falls from bridge into riverbed; One killed, two seriously