ऑटो व मालवाहू गाडीचा अपघात; दोन ठार

By Admin | Updated: October 13, 2016 02:15 IST2016-10-13T02:15:34+5:302016-10-13T02:15:34+5:30

नागपूर- औरंगाबाद महामार्गावरील अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी.

Auto and cargo accident Accident; Two killed | ऑटो व मालवाहू गाडीचा अपघात; दोन ठार

ऑटो व मालवाहू गाडीचा अपघात; दोन ठार

सुलतानपूर, दि. १२- नागपूर- औरंगाबाद महामार्गावर अंजनी खुर्दजवळ ऑटो व मालवाहू पिकअप गाडीच्या अपघातात दोन जण ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.
मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील ऑटोचालक गजानन पायघन एमएच २८- एच ३९१0 या क्रमांकाचा ऑटो घेऊन दुसरबीडला गेला होता. तेथून परत येताना अंजनी खुर्द गावाजवळील मंदिराजवळ समोरून येणार्‍या एमएच १७ बीडी ४४८३ या मालवाहक पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिली. अपघातात ऑटोमध्ये बसलेल्या सखुबाई फकीरा शिंदे (वय ५५ वर्षे) व लोणार तालुक्यातील कोनाटी येथील गुलाब मराजी खंडारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच वंदना श्रीराम शिंदे वय ३४, ऑटोचालक गजानन पायघन, मुक्ताबाई गुलाब शिंदे सर्व रा. खंडाळा देवी ता. मेहकर हे गंभीर जखमी आहेत. सदर अपघात हा महामार्गावरील पडलेल्या खड्डय़ांमुळे झाला आहे. अंजनी खुर्द गावानजिक महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनामुळे मोठय़ा प्रमाणावर अपघात होतात.

Web Title: Auto and cargo accident Accident; Two killed