शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

शुभस्ते पंथे शीघ्रम्

By admin | Updated: December 29, 2014 01:59 IST

नागरी सत्कारात पालकमंत्र्यांकडून अकोलेकरांची अपेक्षा.

अकोला : अकोल्याला अनेक वर्षांपासून चातकासारखी विकासाची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा आता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे संपली आहे. पाटील यांच्या माध्यमातून आता अकोल्याच्या विकासाचा अनुशेष निश्‍चितच भरून निघणार आहे. आता ह्यशुभस्ते पंथ शीघ्रम्ह्ण या न्यायाने अकोल्याचा विकास होईल, अशी अपेक्षा अकोलेकरांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नागरी सत्कारात व्यक्त केली. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. नानासाहेब चौधरी होते. यावेळी मंचावर मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, आमदार गोपीकिसन बाजोरिया, हरीश पिंपळे, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, डॉ. अर्पणा पाटील, माजी आमदार विठ्ठलराव पाटील, विजय जाधव, जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अजय तापडिया, बंडू देशमुख, मुकेश मुरुमकार, तरुण बगेरे, डॉ. किशोर मालोकार, गोपाल खंडेलवाल, अँड. मोतीसिंह मोहता, गोपाल खंडेलवाल, नगरसेवक गजानन गवई आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री रणजित पाटील यांचा सत्कार डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या हस्ते डॉ. अपर्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हारतुर्‍याचा खर्च बाजूला सारून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १२ लाख १७ हजार ७१0 रुपयंचा निधी डॉ. रणजित पाटील यांना देण्यात आला. प्रास्ताविक गोपाल खंडेलवाल यांनी केले. मानपत्राचे वाचन अशोक ढेरे यांनी केले. संचालन डॉ. गजानन नारे यांनी केले. *विकासपर्वाला साथ देणार्‍यांना सोबत घेऊ - पाटील माझ्याकडे येणार्‍या पेशंटला बरं करण्यासाठी मला त्यांचे दु:ख समजून घ्यावे लागले. आता मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. मला आता समाजाची परीक्षा द्यायची आाणि त्यासाठी समाजाचे दु:ख मला समजून घ्यावे लागेल. प्रत्येकाचे दु:ख समजून घेण्यासाठी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी यापुढील काळात करणार आहे, असे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने मी या पदावर पोहोचलो आहे. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे मला सर्वांचेच हित जोपासणे गरजेचे आहे; परंतु पालकमंत्री या नात्याने अकोला व वाशिम या जिल्ह्याला निश्‍चितच झुकते माप राहील. अकोल्याच्या मातीनेच मला संवेदनशीलता, सहृदयता, मानवता, प्रेम शिकविले आहे. माझी नाळ शेतकर्‍यांशी जुळली आहे; ती कधीच तुटणार नाही हा विश्‍वास ठेवा. आमच्या विकासपर्वात जो साथ देईल, त्याला सोबत घेऊन व जो देणार नाही, त्याला बाजूला सारुन आता पुढे जाणार, असे पाटील यांनी सांगितले.