बालिकेला पळविण्याचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: March 15, 2015 00:04 IST2015-03-15T00:04:25+5:302015-03-15T00:04:25+5:30
मातोळा तालुक्यातील घटना; आई व आजीच्या सतर्कता.

बालिकेला पळविण्याचा प्रयत्न फसला
मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील राजूर येथून ३ वर्षीय बालिकेस एका व्यक्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न मुलीची आई व आजीच्या सतर्कतेमुळे फसला. सदर बालिकेला जागवेरच सोडून पळ काढणार्या व्यक्तिला पकडून गावकर्यांनी पोलिसांच्या स्वाधिन केले. राजूर येथील शे. मोबीन शे. यासीन यांचे नदी काठावर घर असून, त्यांची अर्शिया परवीन (३) ही नात घरासमोरील अंगणात खेळत होती. शनिवारी सकाळी ९:३0 च्या सुमारास नारायण गणपत गोरे (५५) याने तिला पैशांचे आमिष दाखवून जवळ बोलाविले व तिच्या अंगावर चादर टाकत तिला घेऊन नदी पात्राकडे पळाला. हा प्रकार बालिकेच्या आई व आजीच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरड केली. त्याचवेळी गावकरी व नातेवाईकांनी पाठलाग नारायण गोरेला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. नारायण गोरे हा मोताळा परिसरात वीट भट्टीवर काम करतो. त्याला दारुचे व्यसन असून, दारूच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत बोराखेडी पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता.