लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम : खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पुलाखाली कोसळून क्लिनर ठार तर चालक जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील नवसाळ फाट्याजवळील पुलाजवळ घडली.नागपूरकडून बडोद्याला लोखंडी पोल घेवून जी.जे. ६ टीटी ६0३९ क्रमांकाचा ट्रक जात होता. नवसाळ फाट्याजवळील पहिल्या पुलावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक सरळ पुलाच्या खाली येऊन उलटला. यात ट्रकमध्ये असलेले लोखंडीपोल ट्रकची कॅबिन तोडून आत आल्याने क्लिनर शुभम चंद्रशेखर कौर (१८) रा. बोलवा रिवा मध्यप्रदेश हा जागीच ठार झाला तर चालक विनोद रामलाल कौर (२६) रा. रिवा हा गंभीर जखमी झाला.या अपघातात ट्रक पूर्णत: चेंदामेंदा झाला. यावेळी जखमी विनोद कौरला उपचाराकरिता तर शुभम कौरचा मृ तदेह शवविच्छेदनाकरिता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे हलविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे आ पल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले व कुरूम आणि नवसाळ येथील गावकर्यांच्या मदतीने ट्रकमध्ये फसलेला जखमी व मृतकाला बाहेर काढले. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पुलाखाली कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 20:09 IST
खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पुलाखाली कोसळून क्लिनर ठार तर चालक जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील नवसाळ फाट्याजवळील पुलाजवळ घडली.
खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पुलाखाली कोसळला
ठळक मुद्देक्लिनर ठार; चालक जखमीराष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील नवसाळ फाट्याजवळ घडली घटना