खेळण्यातील बनावट नोटा देऊन फसवणुकीचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:01+5:302021-02-15T04:18:01+5:30
शेतकऱ्याने रक्कम कोतवाल केशव सरोदे यास परत केली आणि बाहेर माझा कापशी येथील मित्र वाट पाहत आहे, असे कारण ...

खेळण्यातील बनावट नोटा देऊन फसवणुकीचा प्रयत्न!
शेतकऱ्याने रक्कम कोतवाल केशव सरोदे यास परत केली आणि बाहेर माझा कापशी येथील मित्र वाट पाहत आहे, असे कारण सांगून तातडीने पोलिसांशी संपर्क केला. ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-याच्या मदतीला पीएसआय गणेश नावकार, पोलीस कर्मचारी शिंदे, मनीषा घुगे, तिवारी आणि मोडक यांनी कोतवाल केशव आयजी सरोदे व कंत्राटदार विनोद साठे यांना सिंदखेड रस्त्यावरून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ‘बच्चो की बँक’ असे लिहिलेल्या १० लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. शेतकरी सुभाष खंडू ससाने यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ४२० (३४) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी करीत आहेत.