कौटुंबीक वादातून प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:38 IST2019-07-21T12:38:36+5:302019-07-21T12:38:58+5:30
अकोला : शहरातील लहान उमरी परीसरातील ज्योती नगरमध्ये घरगुती वादातून एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना २० जुलै रोजी घडली.

कौटुंबीक वादातून प्राणघातक हल्ला
अकोला : शहरातील लहान उमरी परीसरातील ज्योती नगरमध्ये घरगुती वादातून एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना २० जुलै रोजी घडली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.
ज्योती नगर परिसरातील रहिवासी नंदा नागोराव मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शौचालयामध्ये पाणी का टाकले नाही म्हणून वाद झाला. या वादातूनच संजय डोंगरे नामक युवकाने प्राणघातक हल्ला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.े आरोपी संजय भिकाजी डोंगरे रा. ज्योतीनगर यासह दोघांविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.