खिलाडूवृत्तीने प्रदर्शन केल्यास यश निश्चित - जितेंद्र पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:54 IST2019-09-25T17:54:39+5:302019-09-25T17:54:51+5:30

 राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे उद्घाटन  बुधवार (दि.२५) रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले.

Athletic performance is a sure achievement - Jitendra Papalkar | खिलाडूवृत्तीने प्रदर्शन केल्यास यश निश्चित - जितेंद्र पापळकर

खिलाडूवृत्तीने प्रदर्शन केल्यास यश निश्चित - जितेंद्र पापळकर

अकोला :खेळाडूंनी  खेळात  सातत्य टिकवून ठेवावे तसेच खेळातील जय पराजयचा स्विकार खिलाडूवृत्तीने करून खेळ प्रदर्शन केल्यास यश निश्चित लाभते.हे दोन्ही गुण महत्त्वाचे असून त्याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  केले.
            क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला  यांचे  संयुक्त विद्यमाने १४,१७,१९ वर्षाआतील मुले व मुली  राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे उद्घाटन  बुधवार (दि.२५) रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   आयुष  प्रसाद, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख,  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  प्राप्त  नाजुकराव पखाले,  जिल्हा क्रीडा  परिषदचे  सदस्य जावेद अली, डॉ अमोल रावणकर उपस्थित होते.
            खेळाडूंना शुभेच्छा देत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने स्पर्धेत भाग घेवून यशस्वी व्हावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी केले.  आभार जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी मानले.
            जिल्हा क्रीडा परिषदेचे ध्वजारोहण तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी  विद्यार्थ्यांना  शपथ देण्यात आली. स्पर्धेची सुरूवात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शटल टॉस करून केली.
            दोन दिवस चालणाऱ्या  या राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.

Web Title: Athletic performance is a sure achievement - Jitendra Papalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.