ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:51+5:302021-02-06T04:31:51+5:30

अकोला : शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण जमाबंदी प्रकल्प जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन ...

Assist in surveying the village by drone | ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करण्यासाठी सहकार्य करा

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करण्यासाठी सहकार्य करा

अकोला : शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण जमाबंदी प्रकल्प जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन योजनेच्या जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समितीची जिल्हास्तरीय बैठक गुरुवारी झाली.

यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी महसूल गजानन सुरंजे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. ए. शेळके, नगर रचनाकार विभागाचे गावंडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागाचे विजय चव्हाण, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

गावठाण जमाबंदी योजना ड्रोनद्वारे पूर्ण करण्यात येणार असून, ड्रोन उडानाच्या आदल्या दिवशी १० सेंटीमीटर जाडीच्या चुन्याच्या रेषांद्वारे मिळकतीचे सीमांकन करणे आवश्यक आहे. या योजनेत जनतेने आपल्या खासगी मिळकतीचे सीमांकन ग्रामसेवक व भूमापक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्व नागरिकांनी या योजनेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासकीय मिळकती, रस्ते, सार्वजनिक मिळकती, ग्रामपंचायत मिळकतींचे सीमांकनाचे काम ग्रामसेवकांनी भूमापकांच्या मदतीने पूर्ण करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. ही योजना जनतेकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने व ग्रामीण भागाचा कायापालट होणार असल्याने जनतेला या योजनेत सक्रिय सहभागी करुन घेऊन योजना यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

बाॅकस

जिल्ह्यातील ८६३ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

गावठाण जमाबंदी प्रकल्पाला अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यापासून सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील ८६३ गावांचे गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील १३५ गावांचे ड्रोनद्वारे मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तेल्हारा तालुक्यातील ८१ गावांचे गावठाणाचे ड्रोनद्वारे मोजणी काम सुरू असून, ते १३ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित तालुक्यांतील गावठाण मोजणीचे काम ड्रोनद्वारे एप्रिल २०२१पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Web Title: Assist in surveying the village by drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.