रेल्वे स्टेशन चौकात युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST2021-03-22T04:17:35+5:302021-03-22T04:17:35+5:30

युवक भीम नगर येथील रहिवासी आरोपी फरार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे ...

Assault on youth at Railway Station Chowk | रेल्वे स्टेशन चौकात युवकावर प्राणघातक हल्ला

रेल्वे स्टेशन चौकात युवकावर प्राणघातक हल्ला

युवक भीम नगर येथील रहिवासी

आरोपी फरार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात भीम नगर येथील रहिवासी असलेल्या एका युवकावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून रामदासपेठ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर जखमी युवकास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भीम नगर येथील रहिवासी ऋषिकेश शिरसाट हा युवक रेल्वे स्टेशन चौकातील जैन भोजनालयासमोर उभा असताना पाठीमागून आलेल्या दोन ते तीन युवकांनी शिरसाठ त्याच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला शिरसाट रस्त्यावर कोसळताच परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने या युवकास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध सुरू केला. मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्या आधारावर मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, रामदास पेठचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.

Web Title: Assault on youth at Railway Station Chowk