जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर एकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST2021-01-19T04:20:59+5:302021-01-19T04:20:59+5:30

अकाेला : घुसर येथील ग्रामपंचायतीची मतमाेजणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असतानाच दाेन चुलत भाऊ आपसात भिडले. त्यानंतर एकाने दुसऱ्यावर पूर्ववैमनस्यातून ...

Assault on one near the Collector's Office | जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर एकावर प्राणघातक हल्ला

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर एकावर प्राणघातक हल्ला

अकाेला : घुसर येथील ग्रामपंचायतीची मतमाेजणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असतानाच दाेन चुलत भाऊ आपसात भिडले. त्यानंतर एकाने दुसऱ्यावर पूर्ववैमनस्यातून चाकूने हल्ला केल्याची घटना साेमवारी दुपारी घडली. यामध्ये दीपक गाेपनारायण जखमी झाले असून, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय धान्य गाेदामात साेमवारी मतमाेजणी सुरू हाेती. त्यामुळे अकाेला तालुक्यातील शेकडाे गावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर जमा झाले हाेते. एकेका गावचा निकाल हाती येत असतानाच घुसर येथील मतमाेजणी सुरू झाली. दरम्यान, घुसर येथील रहिवासी सुरेश गाेपनारायण याने पूर्ववैमनस्यातून दीपक गाेपनारायण यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी दीपकला वाचविले. शेजारीच असलेल्या पाेलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून आराेपी सुरेशला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाेन भावंडांमध्ये आपसातील वाद असल्याने हा हल्ला झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या वादाचा, तसेच हल्ल्याचा ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध नसल्याचेही पाेलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Assault on one near the Collector's Office