शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
By सचिन राऊत | Updated: October 30, 2022 19:51 IST2022-10-30T19:51:14+5:302022-10-30T19:51:24+5:30
तीन ते चार मारेकऱ्यांनी आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला.

शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
अकाेला: शिवसेनेचे उपशहर प्रमूख विशाल रमेश कपले(वय ३३ वर्षे) यांच्यावर तीन ते चार मारेकऱ्यांनी रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला केल्याची घटना रामदास पेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ परिसरात घडली़ आहे. हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून रामदास पेठ पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरु केला आहे़
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या जठारपेठ चौकात शिवसेना उपशहरप्रमुख विशाल रमेश कपले हे काेरडे हाॅस्पिटलच्या गल्लीत असतांना त्यांच्यावर तीन ते चार युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला केलाा. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या कपले यांना परिसरातील काही नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहीती असून, या घटनेची माहीती मिळताच रामदास पेठ पाेलिस स्टेशनचे ठाणेदार कीशाेर शेळके ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाेलिस येत असल्याचे कळताच आराेपी पसार झाले असून रामदास पेठ पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरु केला आहे. हल्ला कोणी व का केला, याचा शोध पाेलिस घेत आहेत.