उनखेड-पडसोळा रस्त्याचे डांबरीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:53+5:302021-01-13T04:46:53+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील उनखेड-पडसोळा रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा सुरू करण्यात आले असून, यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट ...

उनखेड-पडसोळा रस्त्याचे डांबरीकरण सुरू
मूर्तिजापूर : तालुक्यातील उनखेड-पडसोळा रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा सुरू करण्यात आले असून, यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट हाेत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्था, अकाेलाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे २२ डिसेंबर २०२०ला सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली हाेती. रस्त्याचे काम दर्जेदार न केल्यास प्रजासत्ताकदिनी बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा इंगळे यांनी तक्रारीत दिला हाेता. या तक्रारीची दखल घेऊन कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदारांना काम सुरू करण्याचा आदेश देऊन ८ जानेवारीपासून या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे.
उनखेड ते पडसोळा हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. या रस्त्यामुळे गाडी स्लिप होऊन माेठा अपघात झाला असता. त्यामुळे संबंधितांनी याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली.