आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांनी दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:06 IST2020-10-14T18:05:46+5:302020-10-14T18:06:17+5:30
Aasha Workers, Agitation, Akola बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे देण्यात आले.

आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांनी दिले धरणे
अकोला : मानधनात झालेल्या वाढीची त्वरीत अंमलबजावणी व कोवीड महामारी संपेपर्यंत एक हजार रुपये प्रती माह प्रोत्साहनपर भत्ता १ जुलै २०२० पासून थकबाकीसह द्यावा, या व इतर मगण्यांसाठी आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत काम करणारे कर्मचारी हे ठरावी काळासाठी कंत्राटी स्वरुपाच्या वैयक्तिक बॉण्डवर कार्यरत असून, शासनाने त्यांना नुकतीच वेतनश्रेणी ठरवून दिलेली आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्य क्षेत्रातील कायमस्वरुपी कर्मचारी आहेत. त्यांची नियुक्ती ठरावीक काळासाठी कंत्राटी पद्धतीची नाही. त्यांना सध्या कामाच्या आधारावर मोबदला मिळतो. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचार्यांचा दजार् द्या व किमान वेतन लागू करून सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनश्रेणी जाहीर करा, तसेच इतर सामाजिक सुरक्षा लागू करा. शहरी व ग्रामीण आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कोविड १९ च्या कामासाठी प्रतीदिन ३०० रुपये विशेष भत्ता देण्यात यावा. गटप्रवर्तकांचा बंद केलेला ६२५ दैनंदिन भत्ता त्वरीत सुरु करण्यात यावा. यायासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या सचीव संध्या पाटील, कार्यकारीणी सदस्य कालिंदा देशमुख, मीना जंजाळ, कविता राठोड, मीना गेबड आदींची उपस्थिती होतीण